अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख खिलारवाडी चे (ता.सांगोला ) डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांनी लिहिलेल्या "ग्रामीण भारताचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील''या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकलूज येथील 'शिवरत्न' बंगला या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडला.
या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवबाबा मोहिते पाटील, नूतन नगरसेवक सयाजी राजे मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवार व महाराष्ट्रातून आलेले अनेक हितचिंतक उपस्थित होते.

