करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब येथे कल्याण कलढोणे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्रीरामाच्या आयोध्येपर्यंत पायी प्रवास करून पंढरपुरी परत आले.
त्यानिमित्ताने कल्याण कलढोणे यांचा सह्रदय श्री चैतन्य जप संकुल प्रकल्पाचे सेवेकरी प्रभाकर रसाळ मंगल रसाळ यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ५५ दिवसांच्या प्रवासात आलेले अनुभव कथन करताना कल्याण कलढोणे यांनी सांगितले की सर्वस्व श्री प्रभू श्रीरामरायावर सोपवल की रामराया नौका पार करतो.मुखामध्ये नाम अतिशय महत्त्वाच सांगून सर्वांनी हा आनंदाचा क्षण अनुभवावा सांगितले.
यावेळी करकंब पत्रकार संघ नूतन अध्यक्ष राजेंद्र करपे , सुदर्शन दुधाणे, चंद्रकांत रसाळ गुरुजी, गणेश दुधाणे, बाळासाहेब इदाते,बंडू वास्ते, राधा इदाते,देवकी दुधाणे, ज्ञानेश्वर दुधाणे आदीजण उपस्थित होते.

