भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी सभा मंडपात पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलालाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी सलीम तांबोळी यांच्या हस्ते श्रींच्या पादुकाची आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम चा जप करत पादुकावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
या कार्यक्रमास परिसरातील महिला व भाविक भक्त यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

