पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे मधील इयत्ता आठवी ते दहावीच्या शंभर हुन अधिक विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रमांतर्गत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.वेणूनगर ता. पंढरपूर येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.
शालेय अभ्यासक्रमातील समाजशास्त्र विषयांतर्गत येणाऱ्या "क्षेत्रभेटी" या उपक्रमाचं प्रत्यक्ष आकलन व्हावं, तसेच समक्ष अनुभूती मिळावी म्हणून शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.आपल्या शेतातील ऊस कारखान्यामध्ये आल्यापासून गव्हानी मध्ये पडल्यापासून त्याचे साखर उत्पादन कसे होते, त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यामध्ये आपल्या शेतातील उसापासून कोजन,डिस्टलरी, इथेनॉल,प्रेसमड, बायोगॅस सारखे उपपदार्थ कसे निर्माण होतात,साखर कारखान्याची यंत्रणा,त्यामध्ये ऊस उत्पादन विभाग, शेती विभाग, इलेक्ट्रिकल विभाग, केमिकल विभाग, तसेच अकाउंट विभाग यांचे कार्य कसे चालते या संदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवली.
विद्यार्थ्यांना कारखाना दाखवण्यासाठी कारखान्याचे विद्यमान चेअरमन व आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेला सांगितले,तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.आर गायकवाड व शेती विभागाचे गुळमकर सुरक्षा विभागाचे माळी यांनी विद्यार्थ्यांना कारखाना दाखवण्यासाठी मदत केली.
विद्यार्थ्यांबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक समाधान गाजरे,प्रवीण कोळेकर सिद्धेश्वर बंडगर,महेश खटके इत्यादी आवर्जून उपस्थित होते विद्यार्थ्यांसोबत प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड, राम मोकळे दिपाली कुंभार इत्यादी शिक्षक उपस्थित होते कारखान्यामधील संचालक मंडळ, अधिकारी, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे अधिकार व कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी समजून घेतली तसेच आपल्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शंका व प्रश्न याचे निरसन कारखान्याचे शेती विभागाचे अधिकारी गुळमकर , सुरक्षा अधिकारी माळी व जेष्ठ कर्मचारी कथले काका यांच्यामार्फत करण्यात आले.
कारखाना प्रशासनाने विद्यार्थ्यांची चहा,नाश्ता आणि बैठक व्यवस्थेची अतिशय चांगली सोय केली.

