भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक २२/१२/२०२५ वार सोमवार रोजी आपल्या वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेमध्ये थोर शास्त्रज्ञ व गणित विषयाचे तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तर्कशक्ती व समस्या सोडविण्याची क्षमता वाढविण्यात गणिताची भूमिका यावर मुख्याध्यापक काळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व गणित विषयाचे विविध शैक्षणिक साधने तयार करून आणले होते त्या शैक्षणिक साधनांची माहिती स्वत: विद्यार्थ्यांनी दिली.
यावेळी प्रशालेतील सहशिक्षक आय.एन.शेख यांनी गणित दिनाविषयी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक एन.एस.जाधव यांनी केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

