नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
नाशिक येथील मानसशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापिका, आदर्श शिक्षिका तसेच प्रख्यात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊन्सलर प्रा. कु. मनीषा त्र्यंबक लहाने यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व मानसोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊन्सलर म्हणून त्यांनी नाशिक शहरात तसेच ग्रामीण भागातही अनेक गरजू व्यक्ती, विद्यार्थी व पालकांना समुपदेशनाच्या माध्यमातून नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन सकारात्मकतेकडे वळले आहे.
प्रा. मनीषा लहाने या एक संवेदनशील, अभ्यासू व समर्पित आदर्श शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून यापूर्वीही त्यांना नाशिक व महाराष्ट्र पातळीवरील विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार प्राप्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, नाशिककरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे.

