करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत आज करकंब गावची लेक आणि राष्ट्रीय योगपट्टू कु.अमृता सरगुले हिने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना योग प्रात्यक्षिके करून दाखवून योगाच महत्व आणि त्याचे होणारे फायदे या बाबतीत योगामुळे आपलं आरोग्य चांगले राहते.रोग प्रतिकारशक्ती वाढते,तसेच आहारा बाबतीत ही अतिशय मोलाचे मार्गदर्शन करत कडधान्ये,दुध,खारीक खोबरे खाल्लं पाहिजे, उघड्यावरील पदार्थ हे शरीराला कसे घातक आहेत याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या वतीने अमृताचा सत्कार करण्यात आला.या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रत्येक शनिवारी योगगुरू तानाजी नरसाळे यांनी प्रत्येक शनिवारी दोन तास मी देणार आहे असे सांगत विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी सातत्यपूर्ण योगदान दिल्यामुळे भविष्यात नक्कीच अमृता सरगुले बनतील अशी आशा वाटते.यासाठी सर्वांनी आपल्या शरीरासाठी वेळ देणं आवश्यक आहे.
प्रत्येक शनिवार हा विना दप्तर आणि विविध उपक्रमांसाठी असणार असून त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अनिल जगताप सहकारी शिक्षक जयवंत कापसे नागनाथ गायकवाड सिध्देश्वर लोंढे कैलास नरसाळे बाळासाहेब खांडेकर देवकी कलढोणे दुधाणे आणि ज्ञानेश्वर दुधाणे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत सांगितले.

