पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर आगारासाठी जास्तीत जास्त लालपरी बसेस उपलब्ध कराव्यात अशी मागणी ग्राहक पंचायतीने केल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रत्येक आगारामध्ये प्रवाशांच्या अडचणी,समस्या, तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रवासी राजा दिन हा उपक्रम सुरू केला आहे त्याप्रमाणे पंढरपूर बसस्थानकावर या उपक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, आगार प्रमुख योगेश लिंगायत,स्थानक प्रमुख अंकुश सरगर,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, तालुका कार्य.सदस्य मंगेश देशपांडे, पांडुरंग ऐतवाडकर,इ.उपस्थित होते.
प्रवासी सेवेमधील अडचणी मांडून सुधारणा करण्याची मागणी केली.
१) पंढरपूर ते पुणे फलटण एक थांबा बस सेवा सुरू करावी
२) पंढरपूर ते पुणे ही बस (निगडी) वल्लभनगर पर्यंत वाढवावी
३) सोलापूर बसस्थानकावरुन पंढरपूरसाठी सायंकाळी सहा ते सात या वेळेत बस संख्या वाढवावी
४) पंढरपूर ते टेंभुर्णी शटल सेवेसाठी इलेक्ट्रिक बस ऐवजी लालपरी बस द्यावी.
५) गर्दीचे वेळी रिझर्वेशनसाठी कर्मचारी (संगणक सह) संख्या वाढवावी.
६) शिवशाही बसची स्थिती अत्यंत वाईट आहे प्रवाशांना त्या दर्जाची सेवा मिळत नाही. चांगल्या बसेस सोडाव्यात.
७) बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था सुधारावी.त्यासाठी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी उपस्थित असावा.
८) बस स्थानकावरील फलाटांची स्वच्छता कायम व्हावी.
९) पंढरपूर मोहोळ वैराग मार्गे तुळजापूर ही बस सेवा सुरू करावी.
अशा मागण्या करण्यात आल्या. विभाग नियंत्रकानी सकारात्मक दृष्टीकोनातून लवकरच सर्व बाबींची पुर्तता करण्यात येईल अशी ग्वाही दिली. वरिष्ठ सहाय्यक समाधान मेटकरी यांनी आभार व्यक्त केले.

