पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
मंगळवेढा येथून पंढरपूर मार्गे पुणे स्वारगेट निगडी पर्यंत जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसवाल्यांनी दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पासून ऐन सुट्टी व दिवाळीच्या सणाच्या काळात अचानक पणे प्रतिव्यक्ती 100 रुपये दरवाढ केल्याने प्रवासी ग्राहक यांच्यात नाराजी पसरली आहे ही दरवाढ त्वरित रद्द करावी अशी लेखी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा आरटीओ यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक अनुसया तिच्या वतीने संतोष उपाध्ये जिल्हा संरक्षण ग्राहक परिषद सोलापूर व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये यांनी मेल पाठवून केली आहे.
सध्याच्या काळात एसटी महामंडळ व इतर कोणी दरवाढी केली नसताना खाजगी ट्रॅव्हल्स बस वाल्याने प्रतिव्यक्ती 100 रुपये दर वाढवून प्रवासी ग्राहकाच्या खिशाला कात्री लावली आहे यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर अकलूज इंदापूर या मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्याकडून पंढरपूरकडे मंगळवेढा कडे येणाऱ्या प्रवासी ग्राहकांना 400 रुपयांमध्ये प्रवास होता परंतु अचानक प्रतिव्यक्ती 100 रुपये दरवाढ करून ती प्रति व्यक्ती पाचशे रुपये केली आहे ग्राहकामध्ये नाराजी पसरली आहे.
मंगळवेढा पंढरपूर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या अशा सुमारे 25 ते 30 खाजगी ट्रॅव्हल्स बस प्रवासी ग्राहक वाहतूक करतात ही अचानक केलेली दरवाढ ग्राहकांना रुचलेली नाही त्यामुळे प्रवासी ग्राहकात नाराजी असून ही केलेली अचानक प्रतिव्यक्ती 100 रुपये दरवाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सुधारित 2020 चा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार वरील प्रकार हा अनुचित व्यापार वर्गात मोडत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून दिवाळीच्या सणात प्रतिव्यक्ती 100 रुपये दरवाढ करून ग्राहकाला ज्यादा दरवाढीला सामोरे जाण्यास ट्रॅव्हल्स वाल्यांनी भाग पाडले असून ही केलेली 100 रुपये दरवाढ त्वरित रद्द करण्यात यावी तशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ यांनी व जिल्हाधिकारी यांनी देण्यात याव्यात अशीही मागणी यात करण्यात आली आहे.