सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या व समाजाला दिशादर्शक ठरलेल्या मान्यवर शिक्षकांचा गौरव करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल रिजन वन तर्फे “लायन्स इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड २०२५” हा भव्य सन्मान सोहळा रविवार दिनांक 21/09/2025 रोजी दुपारी 4 वाजता टिळक अंँम्पी थिएटर, हिराचंद नेमचंद वाचनालय., पार्क चौपाटी जवळ, सोलापूर येथे रिजन वनचे चेअरमन लायन. अँड. श्रीनीवास कटकुर यांचे वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. डाँ.प्रदीपसिंह राजपूत (जिल्हा सरकारी वकील सोलापुर DGP) प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर (प्रसिध्द साहित्यिक व मोटीवेशनल स्पिकर) या पानवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात गौरविण्यात येणारे शिक्षक खालील प्रमाणे आहेत .
१) प्रा. डाँ. श्रीनीवास आनंद ईप्पलपल्ली – (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पुणे)
२)सौ. सुनिता स्वामीनाथ कलशेट्टी ( वीरतपस्वी प्रशाला , सोलापूर )
३) प्रा. अँड. सत्यनारायण चंद्रकांत माने ( प्रथमेश लाँ क्लासेस , सोलापूर )
४) हाजी रिजवान शब्बीर शेख ( मुख्याध्यापक - बालभारती विदयालय , सोलापूर )
५) प्रा. श्री. किरण राजाराम देशमुख ( उपप्राचार्य शिंदे महाविदयालय , परंडा, धाराशिव )
६) प्रा. केदार अशोक जत्ती ( एसवीसीएस काॅलेज, सोलापुर )
७) प्रा. नितीन भारत पवार - ए.जी. पाटील इंजिनिअरिंग काॅलेज , सोलापूर
८) प्रा. नारायण रामचंद्र पाटील , - ( नाझरा काॅलेज, सांगोला )
९) ममता नागेश बुगडे ( भारती विदयापीठ पवार शाळा सोलापुर )
१०) सौ. संज्योती दिनेश बिराजदार ( धर्मण्णा सादुल प्रशाला , सोलापुर )
११) सौ. उमा अरविंद गोप ( बोमडयाल प्रशाला , सोलापुर )
१२) सौ. भक्ती नितिन रत्नपारखी ( कवठेकर प्रशाला , पंढरपुर
१३) श्री. सुरेश मधुकर डिसले ( महाराष्र्ट विदयालय, बार्शी )
१४) सौ. सुनेत्रा सुधीर मोहोळकर – मेहता प्रशाला, सोलापूर
१५) सौ. माधवी मिलिंद अभ्यंकर (गुणवंत शिक्षकत्तेर कर्मचारी पुरस्कार ,)( ग्रंथपाल -दमाणी हायस्कुल सोलापुर )
या शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तीचा गौरव नव्हे तर ज्ञान, संस्कार आणि समाजमनाचा उत्सव आहे. हा सोहळा शिक्षकांचा परिश्रम व कर्तृत्व अधोरेखित करीत समाजात प्रेरणादायी ठरणार आहे.
ह्या सोहळयास माजी प्रांतपाल लायन डॉ. गुलाबचंद शहा आणि माजी प्रांतपाल लायन. अरविंद कोणशीरसगी हे उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमामागे रिजन चेअरमन लायन अँड. श्रीनिवास कटकूर आणि रिजन सचिव लायन चंद्रकांत यादव, रिजन को आँर्डिनेटर प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांची सामाजिक बांधिलकी , दूरदृष्टी आणि शिक्षकांविषयीचा कृतज्ञतेचा भाव दडलेला आहे.
तरी सर्वजण या सुंदर काक्रमाचा लाभ घ्यावा.असे रिजन चेअरमन लायन. अँड. श्रीनीवास कटकुर यांनी कळविलेले आहे.


