पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून जवळपास 66 संघाची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे या स्पर्धा 19 वयोगट व 17 वयोगट मुले मुली यांच्यामध्ये होणार आहेत या स्पर्धेसाठी तुझ्या विभागाचे अधिकारी व क्रीडा शिक्षक उपस्थित राहणार आहेत या स्पर्धा 18 सप्टेंबर व 19 सप्टेंबर अशा दोन दिवस सुरू राहणार आहेत या स्पर्धेमधून निवडण्यात आलेल्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे विभागीय स्पर्धा पुणे येथे पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत. या स्पर्धेविषयी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी केले.
दरवर्षी अतिशय चुरशीच्या आणि निर्णय अशा डॉजबॉल स्पर्धा शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे पार पडत असतात या स्पर्धेचे नियोजन अतिशय चांगले आणि पारदर्शक केले असल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले

