सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ महिला व नवजात शिशु रुग्णालयामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी देवता मूर्ती पूजनाने करण्यात आले मान्यवरांना रक्तदान व स्वस्थ व सशक्त परिवाराची शपथ देण्यात आली.
या प्रसंगी आरोग्य खात्याचे विविध अधिकारी म्हणाले की, "या अभियानातून महिलांचे तपासणी,उच्च रक्तदाब,मधुमेह, गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि क्षयरोगाची तपासणी केली जाईल. विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया तपासणी व समुपदेशनाचे कामही केले जाणार आहे. या अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था,उपकेंद्र, प्राथमिक उपकेंद्र, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय,व महिला रुग्णालय यामध्ये जवळपास 21 प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांचे आरोग्य सशक्त होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित महिला रुग्णांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी आपल्या मनोगतातून समाजात महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल सहकार्य करेल. प्रत्येक घरातील मुली -स्त्री स्वस्थ व सशक्त असतील तरच कुटुंब स्वस्थ व निरोगी राहू शकतो. शासनाचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे असेही म्हणाले. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पदाधिकारी,वैद्यकीय कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दळवी मॅडम यांनी केले तर आभार डॉ वायचळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला हॉस्पिटल मधील सर्व विविध खात्यातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी वृंद व लायन्स क्लबचे सचिव दीनानाथ धुळम व पदाधिकारी इत्यादींचे बहुमोल सहकार्य लाभले.उपस्थित रुग्णांना पौष्टिक फलाहाराचे वाटप करण्यात आले.

