सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलीत जुळे सोलापूर येथे स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू झाले. तीन वर्षाच्या एल.एल.बी. पदवी करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ महाविद्यालयातील अनुलक्ष सभागृहामध्ये संपन्न झाला.
प्रारंभी शाहू शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रवेशित विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अंबादास पांढरे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाहू शिक्षण संस्थेची वाटचाल, उद्देश व विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायातील रोजगाराच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी या कार्यक्रमास उपस्थित असलेले वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थांनी विधी क्षेत्रात नाव लौकीक मिळवायचा असेल तर समाजातील तळागाळातील घटका पर्यंत कायद्याचे ज्ञान पोहचवायचे लागेल. आणि यासाठी विदयार्थीच्या अंगी सतत बोलके असण्याचा गुण असावा लागतो. तरच आपण अंधारा कडून प्रकाशाकडे यशस्वीपणे वाटचाल करू शकतो म्हणजेच भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभुत हक्काचे व कायद्याचे ज्ञान समाजातील वंचीत घटका पर्यंत पोहचवू शकतो असे मत व्यक्त केले
यावेळी प्रस्तावनेत विशेष सहकारी वकील व प्रा. संतोष पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश स्पष्ट केला. तसेच यावेळी प्रातनिधिक स्वरूपात विधी प्रथम वर्षे वर्गातील विद्यार्थी प्रांजली मेने व विनायक साखरे यांनीही आपली विचार व्यक्त केले.
तसेच अध्यक्षीय आढाव्यात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या झुलेखा पिरजादे मॅडम यांनी , विधी शिक्षणाचे महत्त्व, आजच्या काळातील न्याय प्रक्रियेतील बदल व विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाच्या गुणांविषयी विचार मांडले. प्रारंभिक टप्प्यातच महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत असून, हे विधी महाविद्यालय परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना विधी शिक्षणासाठी नवीन संधी प्रदान करेल, असा विश्वास संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमय्या शेख यांनी केले.तर आभार प्रा. शिवाजी कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते.

