पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
संतपेठ पंढरपूर येथील परिसरातील काही दिवसापासून या रस्त्यावरील जड वाहतुकी आणि पावसामुळे मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. हा बायपास रोड असल्यामुळे खूप मोठे जड वाहतूक, स्कूल बस, टू व्हीलर शाळेकरी मुले व कॉलेजचे विद्यार्थी एसटी बसेस या यासारख्या अनेक वाहतूक जातात, त्यांना रोज या ठिकाणी खूप कसरत करावी लागते, येथील वृद्ध महिला विद्यार्थ्यांना व नागरिकांना संतपेठ आणि परिसरातील लहान मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो, पावसाचे पाणी या खड्ड्यामध्ये साठून त्यांचे दुर्गंधी वास येतो.
लहुजी वस्ताद चौक,गोपाळपूर ते मंगळवेढा आणि शाळा नंबर 7 या परिसरातील रोज विद्यार्थी शाळेत जातात, या खड्ड्यामध्ये अनेक वाहन मोठ्या प्रमाणात जात असतात, त्यामुळे नागरिकांच्या किंवा लहान मुलांचा कोणत्याही या खड्ड्यामध्ये पडून कोणाचाही जीव जाऊ शकतो. याला जबाबदार कोण आहे.तसेच काही ड्रेनेज झाकण सुद्धा खाली वर झाले आहेत.
यामध्ये टू व्हीलर किंवा लहान मुले सायकल चालवतात, त्यांना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन जावं लागतं दुखापत जाऊ शकतो, ते पण दुरुस्त करून मिळावेत,आणि शाळेची लहान मुले त्यांना पण याच रस्त्यावरून आणि खाद्यातून शाळेला जावं लागतं, तरी आपण कोणाचा तरी जीव गेल्यावर हा खड्डा दुरुस्त करणार आहात का ?
प्रशासनाने नगरपालिकेच्या सर्वाधिकार्याने तातडीने हे काम प्रामाणिकपणे लक्ष देऊन दुरुस्त करून घेण्यासाठी सहकार्य करावे.अशी मागणी केली जात आहे.
महत्त्वाचा मुद्दा
नवरात्र उत्सव, बुद्ध पौर्णिमा आणि दसरा व शाळेचे विद्यार्थी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असते.स्थानिक स्व राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था.आणि येथील संघटना व मंडळ सर्व नागरिकांच्या वतीने नम्र विनंती
दिपक राजाराम नाईकनवरे (समाजसेवक कार्यकर्ते)
मो 9822778147