इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर जि. पुणे महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राम (Student Induction Program) संपन्न झाला.
सदर कार्यक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२० अभ्यासक्रम ओळख, श्रेयांक पद्धती, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट,राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ, परीक्षा आयोजन नियोजन , ग्रंथालय सुविधा, संगणक प्रयोगशाळा, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम, सांस्कृतिक सहभाग या विषयावर प्रा. योगेश खरात,प्रा.अभिजीत शिंगाडे,प्रा. राजेंद्रकुमार डांगे, डॉ. रामचंद्र पाखरे, प्रा. विनायक शिंदे, डॉ. सुहास भैरट, प्रा. विद्या गुळीग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन रूपनवर, प्रा. ज्ञानेश गवळी, प्रा.सोनाली चव्हाण, डॉ. विनोद देशमुख यांचे सहकार्य लाभले. वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. विलास बुवा व माजी प्रभारी प्राचार्य. डॉ. विजय केसकर यांचे मार्गदर्शन लाभले.