पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस शेळवे कृषी विद्यालय शेळवे या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला .प्रथम विद्यार्थ्यांची 15 ऑगस्ट निमित्त प्रभात फेरी गावातून काढण्यात आली. त्यानंतर शेळवे कृषी विद्यालय शेळवे येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट निमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला तसेच शेळवे कृषी विद्यालय शेळवे या ठिकाणी परंपरेनुसार पाठीमागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला.
चालू शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून माहेश्वरी नवनाथ पाटील इयत्ता दहावी यांची विद्यालयाच्या वतीने निवड करण्यात आली व तिचा सत्कारही करण्यात आला तसेच पाठीमागील वर्षांमध्ये ही तिने इयत्ता नववी मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा समारोप करण्यात आला शेळवे कृषी विद्यालय शेळवे मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासाठी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेळवे कृषी विद्यालय शेळवे यांचा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.