पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रथम सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यानंतर एक सामाजिक जाणीव म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षारोपण ही करण्यात आले.
या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये डीवायएसपी प्रशांत डगळे,पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्रीमती रेखा घनवट, पीएसआय संतोष जगताप, पीएसआय वीरसेन पाटील व पोलीस अधिकारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.