इचलकरंजी प्रतिनिधी तेज न्यूज
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व गोकुळाष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर इचलकरंजी समस्त शिंपी समाज बांधवांच्या वतीने नामदेव भवनात नागपूर येथे होणाऱ्या शिंपी समाजाच्या विश्व संमेलनाचे बॅनर अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष राजनदादा ऊरूनकर, नारायण काकडे, संजयदादा गोंदकर, सुधाकर नाझरे, गोपी बोगाळे, मधुकर खटावकर, उपाध्यक्ष आनंदराव कुडाळकर, अशोकराव बारटक्के, राजू शेंडगे, सुभाष भस्मे, योगेश पाटुकले, उमाकांत कोळेकर, चंद्रकांत पाडळकर, शिंपी समाजाच्या महिला प्रमुख सरोजनी राजन ऊरूनकर, सुधा मधुकर खटावकर सह समस्त शिंपी समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम निकते पंढरपूर, अनिल खटावकर इस्लामपूर उपस्थित होते.