पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हिंदू खाटीक समाज पंढरपूर शहर अध्यक्ष कालिदास शरद जवारे यांच्या संकल्पनेतून भव्य सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जेजुरी मार्तंडे देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड झालेले मंगेश अशोकराव घोणे यांचा सत्कार आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार समाधान दादा अवताडे यांचा सत्कार हिंदू खाटीक समाज शहर अध्यक्ष कालिदास जवारे यांच्या हस्ते करण्यात आला.पंढरपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय विश्वजीत घोडके यांचा सत्कार राहुल आनंद कोथमीरे व नंदकुमार त्रिंबक ताडे यांच्या हस्ते करण्यात आला.शिवसेना शिंदे गट श्रीगोंदा तालुका अध्यक्ष यांचा सत्कार रामचंद्र अंबादास खडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी समाज बंधु महेश इंगोले महेश खडके अंबादास बेंद्रे कैलास गालींदे नितीन कांबळे राजाभाऊ अरुण ताटे बाबा जनार्दन जवारे भीमाशंकर कातवटे सुनील खडके नंदकुमार शिरसागर पिंटू कलाल विशाल जवारे अतुल जवारे नितीन खडके प्रज्वल खडके व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.