भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी राजू कारंडे म्हणाले की अटलबिहारी वाजपेयी हे आपल्या भारत देशाचे दहावे पंतप्रधान होते तसेच हिंदी भाषेचे कवी होते 1991 ते 2009 या काळात भारतीय जनता पार्टीचे ते लखनऊ येथील खासदार होते. वाजपेयी यांनी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष , जनसंघाचे संसदीय नेते जनता पक्षाचे संस्थापक सदस्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अशा विविध पदावर सुंदर असे काम केले आहे.असे कारंडे यांनी सांगितले आहे.
यावेळी डॉ नवनाथ खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे, विश्वजीत देशमुख, नागनाथ निराळी, ऋषिकेश देशमुख, प्रदीप खांडेकर, संतोष कदम, रामचंद्र शिंदे,औदुंबर राजमाने,केशव निराळी,सुनंदा निराळी,मंगल निराळी आदि मान्यवर उपस्थित होते.