भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज वार शुक्रवार दिनांक १५/०८/२०२५ रोजी आपल्या वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेत आपल्या भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने पार पाडला.
यावेळी प्रशालेचे अध्यक्ष व सह. शि.सा.कारखानाचे चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन तर कारखान्याचे संचालक युवराज दगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संचालक युवराज दगडे यांच्या हस्ते प्रशालेतील ध्वजारोहण करण्यात आले व प्रशालेतील सर्व विद्यार्थांनी भारत देशाचे राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गायन करून मान्यवरांच्या उपस्थित ध्वजास मानवंदना दिली.या नंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर अशी कवायत सादर करून दाखवली.
यावेळी प्रशालेतील इयत्ता छोटा शिशु ते इयत्ता सातवी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी आपले स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे सादर केली व यानंतर प्रशालेत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्या बद्दल प्रमुख पाहुणे,अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते
यावेळी दिपक सुनिल लोखंडे इयत्ता पहिली,कु.अरोही सतिश बनसोडे इयत्ता दुसरी, रुद्र आण्णासो घाडगे इयत्ता तिसरी कु.जान्हवी संतोष लिंगे इयत्ता चौथी यांचे शैक्षणिक साहित्य भेट देवून अभिनंदन केले.
यावेळी भाळवणी गावचे जेष्ठ नागरिक व माजी संचालक इ.बा.मुलाणी गुरूजींनी आपल्या मनोगतामध्ये भारत देशाच्या तिरंगा झेंडा व त्यातील रंग यांचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवराज दगडे यांनी आपल्या मनोगतात प्रशालेचे कौतुक करून प्रशालेला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले .
यानंतर प्रशालेचे सचिव एच.आर.जमदाडे यांनी प्रशालेत राबवलेले जाणारे उपक्रम तसेच प्रशालेची एकुण प्रगती याविषयक थोडक्यात माहिती देवुन आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव वसंतराव काळे यांनी मुलांना आपल्या मनोगतातून बहुमोल असे मार्गदर्शन केले आणि प्रशालेतील एकुण सर्व उपक्रम व कामकाजावर समाधान व्यक्त करताना शिक्षकांना अधिक जोमाने आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना देवून पुढील काळात प्रत्येक वेळेस आम्ही प्रशालेस सहकार्य करू अशा शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास प्रशालेचे सचिव हणमंत जमदाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हमीद शेख संचालक सुनिल पाटील,भारतनाना कोळेकर,सुरेशबापु देठे, उपसरपंच दाऊदभाई शेख प्रतिष्ठित व्यापारी शकील काझी,पत्रकार प्रशांत माळवदे,इन्नुस सय्यद,कारखान्याचे कार्यकारी संचालक घोगरे ,मुख्याध्यापक संजय काळे व इतर आजी माजी संचालक मंडळ तसेच प्रशालेतील पालकवर्ग विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर या ७९व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाची सांगता विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोड खाऊ वाटप करुन करण्यात आली.या सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेतील जेष्ठ सहशिक्षक एस.एम.चौगुले यांनी केले.