पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड, डि.एस.आसवले, निवडणुक नायब तहसिलदार वैभव बुचके, मंदिर समितीच्या सदस्या शंकुतला नडगिरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
यावेळी स्वातंत्र्य औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हस्ते शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे पिता मुन्नागिरी गोसावी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.