पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते व माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतिदना निमित्त व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुका दूध संघ, सुधाकरपंत परिचारक वाहतूक संस्था व दूध पंढरी व्हॉलीबॉल संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन इसबावी( पंढरपूर ) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या स्पर्धेचे उद्घाटन पंढरीचा पांडूरंग व श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश (मालक) परिचारक यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर चे सभापती हरिषदादा गायकवाड यांनी भूषविले. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी दिलीप (आप्पा) घाडगे, कैलास खुळे (सर), सतिश मुळे, लक्ष्मण पापरकर, गणेश (भाऊ) अधटराव, प्रणव परिचारक, लक्ष्मण तात्या धनवडे, बाळासो माळी, उमेश विरधे, सुभाष मस्के, विशाल मलपे, ॲड. सुनील वाळुजकर, सचिन शिंंदे, जयंत खंडागळे, आबासो शिंदे, जयमिलिंद कदम, मोहन डावरे, राहुल शिंदे आदी मान्यवरांसह व दुध पंढरी संघाचे सदस्य उपस्थित होते.
आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी या स्पर्धेत विजेत्या संघासाठी आकर्षक ट्रॉफी व खालीलप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.या स्पर्धेच्या सर्व विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी मा. शशी (बापु) भोसले यांचेकडून देण्यात येणार आहे.
पहिल्या तीन क्रमांकांची बक्षिसे गणेश (भाऊ) अधटराव तर्फे देण्यात येणार आहेत. प्रथम : रु. ११,००१/- द्वितीय : रु. ७,००१/- तृतीय : रु. ५,००१/- चतुर्थ : रु. ३,००१/- बाळासाहेब माळी यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. तर पाचवे ते आठवे प्रत्येकी : रु. १,००१/- अनुक्रमे संतोष (तात्या) गायकवाड, तुकाराम गुळुमकर, शशी (बापु) भोसले यांचे तर्फे देण्यात येणार आहे.
खेळाडू व प्रेक्षकांसाठी उत्तम भोजनव्यवस्था सुधाकर पंत वाहतूक संघटना संघाचे व्यवस्थापक जयमिलिंद कदम यांचेकडून करण्यात आली आहे.
या प्रसंगी आयोजकांनी सांगितले की, डिजीटल युगात शारीरिक व्यायामाकडे होत असलेले दुर्लक्ष व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ला जेवढ महत्व आहे त्यापेक्षा जास्त आवश्यक असणाऱ्या "या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रीडासंस्कार, शिस्त व संघभावना विकसित होऊन खेळाडूंना मोठा फायदा होईल."
या कार्यक्रमाचे नियोजन गजेंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कदम सर यांनी तर आभार प्रदर्शन नागनाथ क्षिरसागर यांनी केले.