सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साही वातावरणात कार्यक्रम करण्यात आले .
यावेळी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल चे पालक व सदस्य माननीय श्री कारभारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी समाज उपयोगी घटक म्हणून डॉक्टरांना बोलवण्यात आले. यावेळी डॉक्टर सिंदगी( मेडिकल ऑफिसर) डॉक्टर सचिन बांगर (न्यूरोलॉजिस्ट) डॉक्टर मनोज लंगोटे( बीएएमएस) डॉक्टर महेश आगलावे (एमडीसी के एस डी एम एस) डॉक्टर सुमित चिखलगी (फिजिओथेरपीस्ट) डॉक्टर टी सुरेश कुमार (प्रिन्सिपल ऑफ फिजिओथेरपी )डॉक्टर सचिन जमा (जनरल सर्जन )डॉक्टर गुली सर (पेडिटेशन )डॉक्टर संतोष कालीमार सर आदी उपस्थित होते.त्यांच्या हस्ते सिद्ध रामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यांचा शाळेकडून सत्कार करण्यात आला.
सर्व मुले वेगवेगळ्या वेशभूषेत तयार होऊन आले. मुलांनी उत्साहाने मुलींसाठी गिफ्ट आणले होते. अगदी आनंदी वातावरण तयार झाले होते. सगळ्या चिमुकलया मुलीनी डॉक्टरांना राख्या बांधल्या. डॉक्टरांना सुद्धा एक वेगळाच अनुभव आला. त्यांना परत एकदा शाळेत आल्यासारखे अनुभव आले.काही डॉक्टरांना बहिणी नव्हते आज मात्र भरपूर छोट्या मुली बहिणी म्हणून लाभल्या .डॉक्टर बांगर सर यांनी आरोग्या विषयी काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर जम्मl सर यांनी मुलांना भविष्यात काय करायचे यावर मार्गदर्शन केले. डॉक्टर सिं दगी सर यांनी बहिण भावंड याविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर चिककलगी हे आपल्या शाळेचे विद्यार्थी असून त्यांनी सुद्धा शाळेचे आभार मानले.
डॉक्टर T सुरेश कुमार यांनlही हा प्रोग्राम नवीनच अनुभवायला मिळाला. सौ नीता सोमवंशी मॅम यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व मुलांना सांगितले. या विशेष दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर शिक्षण समितीचे चेअरमन माननीय धर्मराज काडा दी सर व इतर मान्यवर तसेच मुख्याध्यापिका यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे शिक्षक,शिक्षिका इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्य क्रम संपन्न झाला.