भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भाळवणी गावचे सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पोपट नाना इंगोले , भीमराव जाधव , ई बा मुलाणी ,प्रवीण शिंदे ,दीपक गवळी, लुकमान इनामदार सर्व ज्येष्ठ मान्यवर, ग्रामस्थ, प्राचार्य शिंदे के.डी. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.. भारत माता की जय.. वंदे मातरम.. अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून निघाले होते.