जैनवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
जैनवाडी ता पंढरपूर येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज अंतर्गत कृषी दूत कार्यक्रमाच्या माध्यमातून उसाच्या सेटवर बविस्टिनने बुरशीनाशक बियाणे प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पाडले या प्रात्यक्षिकचे आयोजन ऊस बाविस्तीन उत्पादन वाढ आणि रोग नियंत्रणाच्या उद्देश ठेवून करण्यात आले होते
ह्या बुरशीनाशकाचा वापर करून उसाच्या सेटस वरील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवता येते बियाणे प्रक्रिया करताना 1लिटर पाण्यात 2 ग्रॅम बाविस्टीन मिसळून उसाचे सेटस दहा ते पंधरा मिनिटे त्या द्रावणात बुडवून ठेवण्यात आले.
ही प्रक्रिया करून सेट्स सावलीत वाळवून लागवड करण्याचे शिफारस करण्यात आले या प्रात्यक्षिकात रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषी दूध यशराज दळवे ,अमित जगदाळे ,प्रथमेश करे ,प्रशिक साबळे, सुयश साखरे ,सोनू वाडे ,संकल्प शिराळकर, ऋषिकेश गिराम ,आणि ज्योतीराम ढवळे यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले