पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे.
उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरीक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी उपस्थित रहावे असे, आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.