माढा प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उधघाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांचे हस्ते झाले . कार्यक्रम प्रसंगी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी असे म्हटले की, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक राहून व नियमाला धरून आपल्याशी निगडित असणाऱ्या घटकांची कामे वेळेत पूर्ण केली पाहिजेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी अध्ययन, अध्यापन, संशोधन व प्रशासन हे शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे चार स्तंभ असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, वरिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग सोलापूर मा. गोविंद बोंदर, मा. प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख,-अध्यक्ष प्राचार्य महासंघ महाराष्ट्र राज्य, ,मा. नानासाहेब निकम, सहाय्यक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था मध्य विभाग,सातारा , डॉ. अरुणकुमार सकटे - प्रबंधक एस.जी.एम.कॉलेज कराड यांनी कार्यालयाशी निगडित असलेल्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा समारोप प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख व मा. नानासाहेब निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे मा. नानासाहेब निकम यांनी कार्यालयीन कामकाजातील विविध कौशल्य प्राप्त करावीत असे सांगितले. प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी कार्यालयातील सर्व कागदपत्राची योग्य पद्धतीने व नियमाला अनुसरून पूर्तता करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांचे मार्गदर्शनाखाली, संयोजक हणमंत खपाले, समन्वयक प्रा. अशोक लोंढे, पी. एम.- उषा समन्वयक डॉ. सतीश घाडगे, आयक्यूएसी-समन्वयक प्रा.डॉ.नामदेव शिंदे , प्रा.डॉ. घनश्याम हराळे, प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल ,डॉ. रविराज कांबळे, प्रा. संकल्प बारबोले प्रा. शुभम चवरे, सौ. नीता पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.