खडकी प्रतिनिधी तेज न्यूज
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दी मध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहे. चक्क बाजारामध्येच पाच मजली इमारतीचे बांधकाम प्रशासनाच्या डोळ्या समोर सुरू आहे, मात्र याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने कारवाई केली नसल्याने खडकीकरात प्रचंड आश्चर्य व्यक्त होत आहे. खडकी प्रशासनाच्या वतीने केवळ अनधिकृत हातगाड्या तसेच दुकानावर कारवाई करण्यात येत आहे, त्याच प्रमाणे अनाधिकृत बांधकामावर देखील प्रशासन कारवाई करणार काय असा प्रश्न आता खडकीकर उपस्थित करीत आहे.
खडकी बाजारामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सर्रास सुरु आहेत. बांधकामे सुरू असताना देखील बोर्ड प्रशासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्पेशल डोळेझाक होत असल्याने खडकीकारात प्रचंड आश्चर्य व्यक्त होत आहे. खडकी बाजारामध्ये राजघराणाच्या समोर समोरच चक्क ५ मजल्याचे इमारतीचे बांधकाम सुरू आहे, मात्र हे बांधकाम अनधिकृत असून यासाठी कोणतेही प्रकारची परवानगी देण्यात आली असल्याची माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
६२ नवा बाजार येथे चक्क पाच मजलीचे अनाधिकृत बांधकाम सुरू असून कॅन्टोन्मेंट ॲक्ट नुसार पाच मजलीच्या बांधकामासाठी परवानगीच मिळत नाही. खडकी परिसरामध्ये अनेक अनाधिकृत बांधकामाला ऊत आले आहे. अनधिकृत बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात येत नाही. बांधकामासाठी खडकीतील एका सदस्याच्या हस्तका कडून अनधिकृत बांधकामे करण्यात येतात. हे हस्तक बोर्डाचे अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून सर्रास बांधकामे करीत आहेत. या व्यक्तीला बांधकामे दिल्यास बोर्डाचे अधिकारी देखील याकडे बघत नसल्याची चर्चा खडकीकरात रंगली आहे. दरम्यान बोर्ड प्रशासनाच्या वतीने केवळ अनधिकृत दुकाने आणि हातगाड्यांवरच कारवाई करण्यात येते, मात्र अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार काय असा प्रश्न खडकीकरात उपस्थित होत आहे.
खडकी एक बाजार येथील ६२ नवा बाजार या बांधकामाची कोणत्याही प्रकारची माहिती नाही. या बांधकामासाठी परवानगी दिली काय याची चौकशी करून सांगतो.
विकास सिंग
साहाय्यकअभियंता