सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागात सन 2025-2026 करीता आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण 320 जागेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
पात्र उमेदवारांनी सदर 320 जागेकरीता apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. अर्ज सादर करणेचा अंतिम दि 31 ऑगस्ट 2025 असा आहे. कागदपत्र तपासणीचा दिनांक 01 सप्टेंबर 2025 असा आहे.
याबाबत अधिक माहितीकरीता विभागीय कार्यालय, जी.एम.चौक, बुधवार पेठ, सोलापूर 4133002 येथे संपर्क साधणेबाबत अमोल चं. गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर यांनी कळविले आहे.