शेगाव श्री गजानन महाराज दर्शन घेऊन सोलापूर पर्यटन जागर अभियान प्रसार प्रचार सुरुवात
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मागील 20 वर्षापासून ड्रीम फाउंडेशन तर्फे सोलापूरचे पर्यटन व हुरडा,कडक भाकरी शेंगा चटणी ब्रॅण्डिंग व मार्केटिंग साठी नागपूर,गुजरात, हैद्राबाद ,पुणे,delhi,मुंबई,बीड यासह विविध राज्यात प्रसार व प्रचार करण्यात येत असून यंदा 15 दिवसात महाराष्ट्र व देशातील हजारो लोकांना सोलापूर पर्यटन जागर उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान सोलापूर पर्यटन राज्य दौरा पुणे,मुंबई,नाशिक,अमरावती, नागपुर,छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागात होणार सोलापूर पर्यटन जागर मार्केटिंग व ब्रॅण्डिंग लाखो लोकांना सोलापूर दर्शन चे निमंत्रण देणार
सोलापूर पर्यटन जागर उपक्रम
राज्यातील 900 प्रवीण प्रशिक्षक विविध शासकीय कर्मचारी,अधिकारी यांना शासनाचा विविध प्रशिक्षण केंद्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देतात त्यांना शेगाव येथील राज्य अधिवेशन मध्ये निमंत्रण देण्यात आले त्यांच्या मार्फत राज्यभर सोलापूर पर्यटन जागर करण्यात येणार आहे सोलापुरात उत्पादित विविध वस्तू राज्यभर व देशात विक्री साठी प्रयत्न करण्यात येणार आहे
सोलापूर पर्यटन जागरसाठी
महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लास संघटना CCA यांचे मोलाची साथ CCA कोचिंग क्लास असोसिशन ज्यांचे राज्यात 450 हून अधिक क्लास संचालक सभासद आहेत त्यांचे 6 वें अधिवेशन सोलापुरात घेण्यासाठी राज्य अध्यक्ष प्रा पंढरीनाथ वाघ,राज्य उपाध्यक्ष प्रा ज्ञानेश्वर ढाकणे,सचिव प्रा इप्पर सर,समन्वयक प्रा अजबराव मनवर यांना विनंती करण्यात आले.
त्यांनी तात्काळ होकार दिले त्यानुसार राज्यातील 36 जिल्ह्यात कार्यरत CCA सभासद संचालक मंडळ यांना सोलापूर येथे राज्य अधिवेशनसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले त्यांना सोलापूर पर्यटन जागर मध्ये सोलापूर दर्शन करण्यात येणार आहे यामध्ये अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन,श्री गाणगापूर दत्त दर्शन,पंढरपूर पांडुरंग दर्शन,श्री संगमेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल यासह ग्रामदैवत श्री सिध्देश्वर दर्शन मिळणार आहे.
शेगाव श्री गजानन महाराज दर्शन घेऊन राज्य प्रवीण प्रशिक्षण अधिवेशनमध्ये विशेष सर्वांना सोलापूर दर्शन भेटीचे निमंत्रण आज रविवार 17 ऑगस्ट रोजी दिले यावेळी विविध कौशल्य विकास केंद्र व विविध कोर्स प्रशिक्षण देणारी राज्यातील हजारो प्रशिक्षक सभासद उपस्थित होते
पर्यटन जागर पंधरवडा
सोलापूर पर्यटन जागर मंच बसव संगम शेतकरी गट चाणक्य गुरुकुल तर्फे 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान सोलापुरातील 11 तालुक्यात पर्यटन जागर रथ फिरणार असून या पंधरवड्यात सोलापूरचे भूमिपुत्र अधिकारी सोलापुरी पुणेकर राज्यातील उद्योजक स्वामी भक्त हौशी पर्यटन प्रेमी यांना निमंत्रण देण्यात आले आहे
*पर्यटन जागर उपक्रमात*
माझं आवडत सोलापुरातील पर्यटन स्थळ यावर
*भव्य निबंध स्पर्धा*
*खुली वक्तृत्व स्पर्धा*
पर्यटन सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात येणार आहे.शेतकरी,युवक,कृषी पर्यटन,महिला बचत गट यांचे विशेष सहभाग असणार आहे
श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी शेगाव येथील मथुरा lown येथे युवा मी स्वतः काशीनाथ भतगुणकी प्रवीण प्रशिक्षक सोलापूर पर्यटन जागर उद्योग,रोजगार याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी कर्जतचे श्री व्होरा साहेब,नाशिक चे श्री प्रशांत पाटील,धुळे चे श्री गणेश शिंदे यांच्यासह राज्यातील 35 जिल्ह्यातील 216 प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते
विशेष कार्यक्रम
27 आणि 28 सप्टेंबर पर्यटन जागर व भव्य रोजगार मेळावा घेण्यात येणार असल्याचे संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी कळविले असून जास्तीत जास्त शाळा,कॉलेज,कंपनी,पर्यटन केंद्र,शेतकरी,युवक,उद्योजक, कोचिंग क्लास संचालक व पर्यटन प्रेमी लोकांनी या पर्यटन जागर उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.