मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
२६ जुलै कारगिल युद्धात पराक्रम शौर्य व आदम्य साहस दाखवणाऱ्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्याचा आजचा दिवस याच दिवशी कारगिल मधील पाकिस्तानी घुस खोराविरुद्ध ऑपरेशन तलवार, ऑपरेशन सफेद सागर व ऑपरेशन विजय अशी मोहीम राबवून विजय मिळवून देणाऱ्या शूर वीरांना आदरांजली वाहण्याचा दिवस .
26 जुलै 2025 रोजी कारगिल मधील विजय उत्सव साजरा करून शहिदांना मानवंदना तीन महाराष्ट्र बटालियन बॉईज आर्मी युनिटच्या वतीने आज देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्वे तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ सर आणि पर्यवेक्षक रवींद्र खोंडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहिदांना मानवंदना देण्यात आली तसेच ड्रॉइंग कॉम्पिटिशन ही आयोजित करण्यात आली होती.रत्नकांत विचारे यांनी अत्यंत सुंदर असे फलक लेखन केले होते.
अवधूत चव्हाण , उत्तम साळवी यांनी या कार्यक्रमास सहाय्य केले सदर कार्यक्रम शाळेचे एनसीसी ऑफिसर व शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांनी आयोजन केले होते