सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले आहे
सांगोला विधानसभा मतदारसंघातील जुनोनी,घेरडी,आलेगाव वासूद आणि पाचेगाव बु!! या पाच ग्रामपंचायतींना पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत नविन ग्रामपंचायत इमारती बांधण्यासाठी प्रत्येकी ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचा निधी ग्रामविकास खात्याकडुन मंजुर झालेला असुन. सदर विकास निधी मंजूर करण्यासाठी सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब व ग्रामविखास खात्याकडे रितसर मागणी केलेली होती.
आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी अनेक गावांतील ग्रामपंचायत ईमारती बांधण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित केलेला होता.त्यांच्या या मागणीचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करुन सांगोला तालुक्यातील पाच गावच्या ग्रामपंचायत ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी २५ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
जुनोनी ,घेरडी,आलेगांव,वासुद व पाचेगाव बु!! या गावातील नागरीक आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या कामावर खुष झालेले असुन,त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहीती शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.