करकंब गावच्या लेकीचं झाड,संतांचे झाड ही संकल्पना मला अतिशय आवडली:- आय पी एस अधिकारी अतुल कुलकर्णी
करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान आणि हरित वारी टीमच्या माध्यमातून भविष्यात आणखी झाडे लावणार
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
आज २२ जून करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम.आणि हरित वारी अभियानांतर्गत आज अतुल कुलकर्णी ,सागर कुंजीर ,दिलीप कोरके.आणि करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच लेकीच झाड ही संकल्पना संंकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी समजून सांगत संतांच्या नावान ही झाड पालखी मार्गावर लावल्याचे सांगितले त्यावेळी अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की अतिशय सुंदर कल्पना असून ही प्रत्येक गावागावात राबवली पाहिजे.यासाठी याचा प्रचार आणि प्रसार व्हावा.तसेच आमच्या वतीनेही पाहिजेल तेवढी झाड देणार सांगून सर्व करकंब गावच्या तरुण वृक्षप्रेमींनी अतिशय सुंदर काम केलं असून कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
हा सुंदर योग घडवून आणण्यासाठी करकंब पोलीस स्टेशनचे आदरणीय सागर कुंजीर यांनी १००००/-देणगी जाहीर केले. आणि परिश्रम घेत वृक्षारोपणचा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी ४० झाडांना ट्री गार्ड शेडनेट बसवले.आणि अतुल कुलकर्णी साहेबांच्या परिवाराच्या नावानं झाड लावली.यावेळी मेंढापूर येथील वृक्षप्रेमी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.आणि मेंढापूर येथेही ७५०० झाड लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिलीप कोरके यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करकंब पोलीस स्टेशन कर्मचारी स्टाफ तसेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे बापू खारे, विश्वजीत शिंदे,हरिश्चंद्र वास्ते, नागेश खारे, देविदास काटवटे,विशाल बोधे, पृथ्वीराज धोत्रे,पांडुरंग काटवटे, गणेश पिसे,चेतन पुरवत , संतोष भोसले,लक्ष्मण जाधव,नंदलाल कपडेकर, प्रमोद रेडे, आदींनी अधिक परिश्रम घेतले.