छ.संभाजीनगरच्या "चाईल्डहूड" मित्र मंडळाच्या उपक्रमास संपादक राजा माने व लेखक शाहू पाटोळे यांची उपस्थिती
छ. संभाजीनगर प्रतिनिधी तेज न्यूज
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 गव्हर्नरपदी येथील सतीश लोणीकर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा चाईल्डहूड मित्र मंडळाच्यावतीने किराणा चावडी येथील हॉटेल ग्रँड मधुरम मध्ये छोटेखानी कार्यक्रमात संपादक राजा माने व लेखक शाहू पाटोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आता.
सतीश जी लोणीकर यांची रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी २९२८-२९ सालासाठी निवड झाल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व संपादक राजा माने यांच्या हस्ते व प्रख्यात लेखक शाहू पाटोळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रोटेरियन सुरज डूमणे, अमित कोरडे, चाईल्डहूड मित्र मंडळ चे सदस्य दगडोजीराव देशमुख शैक्षणिक समुहाचे सर्वेसर्वा विजय राऊत , उद्योजक विवेक जयस्वाल, विजय जैस्वाल,जितेंद्र भारुका, मनीष जयस्वाल, पुष्कर जयस्वाल, अनिरुद्ध जयस्वाल आदी उपस्थित होते. यावेळी सतीश लोणीकर यांनी रोटरी इंटरनॅशनल जगभर राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.


