गोवा प्रतिनिधी तेज न्यूज
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने तिसरे राष्ट्रीय महा अधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे ४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते, ह्या महा अधिवेशनाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा झाली.
ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार या सह अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधातील विविध संविधानिक बाबी या बाबतीत सखोल व अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
पणजी येथे आयोजित डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महा अधिवेशनात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) या विषयावर ते बोलत होते.
ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांना सन्मान चिन्ह ,शाल ,गुलाब पुष्प देऊन पणजीचे खासदार सदानंद शेठ तानवडे यांनी सत्कार केला.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंदशेठ तानवडे, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी उपस्थित होते. ह्यावेळी संपादक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


