भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण केले पाहिजे. तरच विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होतात. असे मत ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक व व्याख्याते काशिनाथ भतगुणकी यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी येथे मी यशस्वी होणारच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नितीन शिंदे पत्रकार प्रशांत माळवदे कीर्ती कॉम्प्युटर सेंटरचे राहुल ताटे देशमुख उपमुख्याध्यापिका मोरे पर्यवेक्षक बेसिकराव हे उपस्थित होते.
यावेळी काशिनाथ भतगुणकी म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात आपले आई-वडील व गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे. आपल्या शालेय जीवनात एक स्वप्न पाहिले पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास, कष्ट ,मेहनत घेतली पाहिजे. आपले जीवन यशस्वी करण्यासाठी एक सुंदर स्वप्न मनामध्ये असले पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.मनात आत्मविश्वास असला पाहिजे, शिस्त असली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ असे ही भतगुणकी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत विधाते यांनी केले तर आभार रणजीत दडस यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.