पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एमबीए या पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस सुरवात झाली असून ही प्रक्रिया शनिवार, दि.२८ जून २०२५ पासून सुरु झाली असून बुधवार, दि.८ जुलै २०२५ (सायं. ५.००) पर्यंत चालणार आहे. कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेल्या व एमबीए ची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना एमबीए प्रवेशासाठी सदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए विभागात उपलब्ध आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले व ज्यांनी एमबीएची सीईटी परीक्षा दिली आहे, असे विद्यार्थी बुधवार, दि.८ जुलै २०२५ (सायं. ५.००) पर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रकिया करू शकणार आहेत. कागदपत्रे पडताळणी करून खात्री करणे यासाठी सोमवार, दि.३० जुन २०२५ पासून ते गुरुवार, दि.९ जुलै २०२५ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे व कागदपत्रे पडताळणी करून खात्री करणे आदी बाबी करता येणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल/नंबर सोबत असावा. ‘सदरची नोंदणी यशस्वीपणे आणि बिनचूकपणे केलेले विद्यार्थीच शासनाच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहतील. सदर कॅप राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थीच शासनाच्या वेगवेगळ्या सवलती घेण्यास पात्र राहतील.
त्यामुळे ही प्रवेश नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून सर्व विद्यार्थी व पालकांनी स्वेरीत येऊन ही प्रक्रिया येथील तज्ञ शिक्षकांमार्फत पूर्ण करून घ्यावी.’ असे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील यांनी केले आहे. एमबीए प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता डॉ. करण पाटील (९५९५९२११५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.