कल्याण प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात झालेली आहे, त्या अनुषंगाने नुकताच टीटवाळा येथे पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण, ठाणे यांच्या आदेशानुसार कल्याण तालुका पोलीस स्टेशन यांच्या मदतीने टिटवाळा मांडा परिसरात राजेश ग्राफिक या दुकानात इण्डियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंटी पायरसी सेल) मुंबई चे मुख्य तपासी अधिकारी रामजित(जीतु) गुप्ता यांनी छापा टाकून एका इसमाच्या विरोधात काॅपीराईट अंतर्गत पायरेटेट साॅफ्टवेअर वापरत असल्याने काॅपीराईट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.
सदर कार्यवाही कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चोरगे , इण्डियन काॅपीराईट प्रोटेक्शन चे मुख्य तपासी अधिकारी रामजित(जितु) गुप्ता,रवि वासवानी गीतांजली शिर्के , व दिपाली पाटील यांनी केली.