करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमला करकंब पोलीस स्टेशन आणि करकंब ग्रामपंचायतीचे अनमोल सहकार्य
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी 600 झाड उपलब्ध करून दिली
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
आज रविवार 29 जून रोजी महा वृक्षारोपण मोहिमेत करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने आणि हरित वारी निर्मल वारी अभियानांतर्गत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी 600 वृक्ष उपलब्ध करून दिली.आणि ती झाड करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनाखाली आणि करकंब ग्रामपंचायतीच्या विशेष सहकार्यातून आज संत एकनाथ महाराज पालखी मार्ग अरण रोडवर जवळपास 200 भारतीय जातीच्या झाडांचं वृक्षारोपण केले.यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये पोलीस अधिकारी सागर कुंजीर , उपसरपंच विवेक शिंगटे, करकंब भुषण जिल्हा न्यायाधीश राजकुमार मलशेट्टी ,ग्रामसेवक डॉ सतीश चव्हाण ,रेंज फॉरेस्ट ऑफिसर काळे , पत्रकार लक्ष्मण जाधव, चंद्रकांत उंबरदंड,यांनी उपस्थिती दर्शविली.करकंब पोलीस स्टेशनचे अंतर्गत आजपर्यंत जवळपास 600 झाड विविध भागात लावत अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात घरासमोर लावण्यासाठी वाटप करण्यात आली.तसेच यासाठी करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी मार्गावर 200 खड्डे खणून घेण्यासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून दिली.आणि गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने 50 झाड ट्री गार्ड सहीत लेकीच्या नावानं लावली.
यासाठी सकाळी 7 वाजेपासून अधिक परिश्रम करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे, विशाल बोधे, हरिश्चंद्र वास्ते,बापू खारे,छगन खारे,अमोल शिंदे,प्रमोद रेडे, विश्वजीत शिंदे,रुपालीताई देशमुख, तसेच करकंब पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदींनी अधिक परिश्रम घेतले.