पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर तालुका विधी सेवा समिती, व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विदयमानाने किमान समान शिबीरा अंतर्गत तसेच वाखरी ग्रामपंचायत येथे पंढरपूर तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह दिवाणी न्यायाधीश एन. एस. बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिबीरात न्यायाधीश एन.एस. बुद्रुक, यांनी उपस्थीत ग्रामस्थांना कायदेविषयक जनजागृती करुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. अॅड. देशमुख यांनी उपस्थित गावक-यांना तंबाखू विरोध दिनांबाबत मार्गदर्शन केले तसेच अॅड. चौगुले यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळाबाबतच्या कायदया विषयी मार्गदर्शन केले.
प्रारंभी कायदेविषयक शिबीराची प्रस्ताविका पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. श्री.आर. बी. चौगुले यांनी केली, तर सुत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव अॅड. ए.एम. देशमुख यांनी केले. सदर शिबीरास विधी स्वंयसेवक सुनील यारगट्टीकर, तसेच न्यायालयीन कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.