वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
वेळापूर येथे माहिको समृद्धी किसान मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी महिकोचे रिजनल मॅनेजर सुंदर वायाळ यांनी शेतकरी बांधवांना महिकोचे क्रांतिकारी वाण 3845,4064,सदाशिव, या वाणाबदल लागवडीपासून ते मका निघेपर्यंत सखोल माहिती दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घेतले अशा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. व त्यांचे मनोगत घेण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेळापूर सोसायटी चेअरमन अमरसिंह माने देशमुख, आनंदराव माने देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब माने, रिपाई तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे ,महीकोचे विक्रेते किरण बोधले,योगेश देशमुख , शशिकांत शिंदे,मल्हारी बनकर भीष्माचार्य कुदळे अमृतराव माने देशमुख ,विश्वास वाघे, शिवाजी मोहिते, दीपक राऊत व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला सावता मेहञे, भागवत गायकवाड,माऊली मेहञे, मल्हार शिंदे, मल्लिकार्जुन कुरुडकर, उमेश बनकर, तानाजी सावंत आदी. सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल महानोर, दशरथ नवगिरे ,चैतन्य शिंदे,विवेक महाजन यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रस्ताविक राहुल महारनूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ नवगिरे यांनी केले.