भाळवणी प्रतिनिधी
मार्च 2025 मध्ये राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये जि. प. प्राथ. शाळा भाळवणी (मुली) येथील इयत्ता तिसरी मधील कु. शिवंण्या गणेश पिसे हिने 300 पैकी 272 गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक मिळवला आहे.
तसेच रुंजी समाधान देठे हिने 300 पैकी 268 गुण मिळवून राज्यात दहावा क्रमांक, उपासना सचिन शिंदे 264 गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक ओवी अजित लिंगे 262 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा क्रमांक, प्रणिती जयंत शिंदे 254 गुण मिळवून जिल्ह्यात आठवा क्रमांक , राजकन्या नितीन कांबळे केंद्रात प्रथम क्रमांक , अल्फिया समीर मुजावर केंद्रात द्वितीय क्रमांक, प्राजक्ता सतीश लिंगे केंद्रात दुसरा क्रमांक , आनंदी अभयसिंह कलढोणे केंद्रात तिसरा क्रमांक, आरोही विश्वास बोधे केंद्रात चौथा क्रमांक , वेदश्री पवनकुमार म्हेत्रे केंद्रात पाचवा क्रमांक , स्वरा भिमराव शिंदे केंद्रात आठवा क्रमांक तसेच , अर्पिता अमोल शिंदे हिने केंद्रात अकरावा क्रमांक मिळविला आहे.
या सर्व मुलींना वर्गशिक्षिका महानंदा भगवान साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिका यांचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे , केंद्रप्रमुख श्रीमती शारदा रासकर , मुख्याध्यापक सुरेश शिंदे,शा.व्य. समिती अध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य ,पालक यांनी अभिनंदन केले.