पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते कृषिमंत्री मंत्री कोकाटे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, विशेष कार्य अधिकारी ,ईशाधीन शेळकंदे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.