निःस्वार्थी व्रुत्तिने गोरगरीब ,अनाथ व वयोवृद्ध यांची तळमळीने तसेच आत्मीयतेने सेवा करणारी संस्था जॉय ऑफ गिविंग आणि उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच अध्यक्ष गणेश हिरवे
जॉय ऑफ गिविंग या सामाजिक सेवाभावी संस्थेचा 10 वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी मुंबई येथे संपन्न होणार आहे त्याबद्दल सर्व प्रथम संस्थेला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे .खरंतर या संस्थेची स्थापना 10 वर्षांपूर्वी आपण समाजाचे काही देणे लागतो हे उद्दिष्ट विचारात घेवून ,माननीय श्री गणेश हिरवे सर यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेतून झाली .दैवयोगाने आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला व आपण हा जन्म कसा सत्कर्मासाठी सार्थकी लावता येईल या भावनेतून जी निःस्वार्थी व्रुत्तिने समाजसेवा आपल्यां हातून घडत असते यातूनच माणुसकी दर्शन घडते व माणुसकी धर्म जोपासला जातो आणि हेच महत्कार्य या संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश हिरवे सर यांच्या हातून घडत आहे .नुसती मला समाजसेवा करायची आहे असे म्हणून चालत नाही तर त्याची सुरवात तन मन धन सह आपल्यां स्वतः पासून करावी लागते व समाजातील वंचित घटक गोरगरीब ,अनाथ व वयोवृध्द या बद्दलची जाण ,तळमळ ,आत्मीयता,आपुलकी व जिव्हाळा ही मुळात उपजत असावी लागते .जॉय ऑफ गिविंग या सेवाभावी सामाजिक संस्थेने गेली दहा वर्ष मुंबई शहर ,मुंबई उपनगर ,ठाणे ,रायगड व नवी मुंबई व पालघर येथील दुर्गम ,अविकसित ,अप्रगत भागातील आदिवासी पाडे येथील नागरिक ,शाळेतील गोरगरीब व वंचित विद्यार्थी तसेच वृध्दांश्रमे,अंध विद्यालये ,कुष्ठरोग केंद्र इत्यादींना त्यांच्या खडतर भागात प्रत्यक्ष जावून , त्यांच्या आवश्यक गरजेनुसार शैक्षणिक साहित्य ,वह्या पुस्तके ,अन्न धान्य किट , गणवेश ,दफ्तर व मिष्टान्न ,गरजूंना दिवाळी
सणानिमित्त नवीन कपडे वाटप करून करीत आहे ही बाब कौतुकास्पद तर आहेच पण उल्लेखनीय आणि गौरवास्पद सुद्धा आहे
कोणतीही सामाजिक सेवाभावी संस्था उपेक्षित ,वंचित घटक यांच्या निःस्वार्थी सेवेसाठी स्थापन करणे हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्तीच्या आवाक्या बाहेरील कठीण कार्य असून व ते पण अर्थ सहाय्य शिवाय करणे ही तारेवरिल कसरत आहे त्यासाठी स्वतःची मानसिकता असावी लागते परंतु संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश हिरवे सर यांनी आपल्यां कुटुंबीयांची साथ घेवून समाजसेवेचे पेरलेले बीज वटवृक्षात पाहण्याकरिता आपल्यां शांत व प्रेमळ सुस्वभावी व्रुत्तिने समाजसेवेची अंतर्मनापासून आवड असलेल्या जनतेशी संपर्क साधून सर्व दानशूर मंडळीना एकत्र आणून सर्वांच्या सहकार्याने हा मदतीचा रथ चालवत आहे
अश्या जॉय ऑफ गिविंग सारख्या निःस्वार्थी व्रुत्तिने वंचितांच्या सेवा करणाऱ्या सेवाभावी संस्थाना समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचे हात बळकट केल्यास या सारखे पुण्यकर्म नाही .गोरगरीब ,वंचित ,अनाथ आश्रम व वृध्दाश्रमे ,अंध ,अपंग ,दृष्टीहीन याना माणुसकी हाच खरा धर्म समजून ,कोणत्याही रूपात मदत केल्यास ती त्याना निश्चित उपयुक्त ठरते .व आपला मानव जन्म सुद्धा सत्कर्मा साठी सार्थकी लागला याचे आपल्याला मोठे समाधान मिळते
#दीनदुबळ्या ,वंचित घटक ,गोरगरीब ,अनाथ आश्रम ,वृद्धाश्रमे ,यांची केलेली सेवा हीच ईश्वर सेवा आहे #आपण सर्वांनी मिळून जॉय ऑफ गिविंग चा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यासाठी
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
प्रदीप पंढरीनाथ जोशी
जेष्ठ वृत्तपत्र लेखक व मुक्त पत्रकार व अध्यक्ष ,महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालय व रुग्णालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना ( महाराष्ट्र राज्य )