खर्डी प्रतिनिधी तेज न्यूज अमोल कुलकर्णी
विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार नृसिंह अवतार.पंढरपूर तालुक्यतील खर्डी येथे नृसिंह जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील कुलकर्णी वाडा,हिलाळपार,येथील मूर्तीवर सकाळी अभिषेक करण्यात आला.
दुपारी भजन करून सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी फुले वाहण्यात आली.जन्मांचा अभंग आणि कडकडला स्तंभ गडगडले गगन या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी गायक सुशील खर्डीकर,बाळासाहेब परिचारक,बापू केसकर,देविदास परिचारक,रामदास रोंगे,राजाभाऊ केसकर,सुरेश पंढरी,नंदकुमार कुलकर्णी,हरिभाऊ कुलकर्णी समस्त (केसकर) कुलकर्णी परिवार तर कुंभार वाडयात भिकाजी कुंभार,गणेश कुंभार,खंडू कुंभार,सुनील कुंभार, रामदास कुंभार आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.रविवार असल्याने नाभिक समाजाने दुपारी दोन नंतर व्यवसाय थांबवून जयंती व प्रसादाचे हिलाळ पार येथे आयोजन केले होते.समाधान हिलाळ ,दत्ता हिलाळ,प्रशांत हिलाळ,आबा हिलाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंती दिवशी काही ठिकाणी उपवास पाळण्यात आला तर प्रथेनुसार काही ठिकाणी प्रासादिक भोजनाचे भात आमटी, शिरा व्यंजने आयोजन करण्यात आले.तर कुलकर्णी वाडा येथेही प्रसादाचे दुसरे दिवशी नेवेद्य नंतर आयोजन असते.गावात सर्वत्र धार्मिक वातवरण होते.कुठेही स्पिकर गोंधळ न करता अत्यंत शांततेत नृसिंह जयंती पार पडली.