भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता.पंढरपुर, जि. सोलापुर या कारखान्याचा गळीत हंगाम 2025-2026 साठी ऊस तोडणी वाहतुक करार शुभारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली दि. 30/04/2025 रोजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत (नाना) सोपान कोळेकर तसेच ऊस तोडणी वाहतुक उपसमिती चेअरमन मोहन वसंतराव नागटिळक यांचे शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक राजसिंह माने, प्र. कार्यकारी संचालक पी डी घोगरे, मुख्य शेती अधिकारी आर जे नरसाळे, शेती अधिकारी पी आर थोरात, ऊस पुरवठा अधिकारी.एच आर गिड्डे व सर्व खातेप्रमुख, वाहतुक कंत्राटदार धनाजी मारुती कवडे, शंकर उद्धव डोंगरे रत्नाकर बिभीषण गायकवाड, अशोक नागन्नाथ गायकवाड, अर्जुन किसन बागल, मधुकर नामदेव ताटे, गणेश नागनाथ माने करण अर्जुन बागल बीड भागातील बैलगाडी मुकादम गोपाळ आप्पा चौरे, दत्तात्रय नवनाथ चौरे चंद्रकांत गोपाळ चौरे, ऊस उत्पादक शेतकरी व शेती विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होते तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त वाहतुक ठेकेदार यांनी शेती आफिसला येवुन लवकरात लवकर करार करुन घेणेत यावेत.