भाळवणी प्रतिनिधी
फेब्रुवारी २०२५ मध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा झाली होती .या परीक्षेत भाळवणी मुलींच्या शाळेने भरघोस यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी इयत्ता ३ री मधून १२ व इ.४ थी मधून ३ मुली परीक्षेसाठी बसलेल्या त्या सर्व उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत.
कु. ओवी अजित लिंगे २८४ गुण मिळवून राज्यात ९ वी व जिल्हयात ४ था क्रमांक प्राप्त केला आहे. शिवण्या गणेश पिसे व उपासना सचिन शिंदे यांनी समान २८० गुण मिळवून केंद्रात प्रथम व जिल्ह्यात ६ वा क्रमांक मिळवला आहे. कु रुंजी समाधान देठे हिने २७४ गुण मिळवून केंद्रात दुसरा क्रमांक व जिल्ह्यात ९ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थिनींना वर्गशिक्षिका महानंदा भगवान साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
तसेच इ.४ थी मधून रचना पवन सातपुते हिने २८४- गुण मिळवून राज्यात ९ वा व जिल्ह्यात ४ था क्रमांक मिळवला. या विद्यार्थिनीला श्रीमती उषा बबन कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी मुली व मार्गदर्शक शिक्षक यांचे गावचे सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्षा अश्विनी कुचेकर सर्व सदस्य, पालक, केंद्रप्रमुख श्रीमती शारदा रासकर , मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी अभिनंदन केले.