लातूर प्रतिनिधी नंदकुमार बागडे पाटील तेज न्यूज
द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी सातारा येथे जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यवसायिक, कला-क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०० पेक्षा जास्त व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रामचंद्र सुपेकर यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आदर्श समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सहसचिव तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सल्लागार व संतपंढरी वृत्तपत्र संपादकीय कायदेशिर सल्लागार ॲड. सोमनाथराव गोपाळे, द सरकार टाइम्स, संतपंढरी मीडिया निघोज शहर प्रतिनिधी सलिमभाई हवालदार, बाळकडू व संतपंढरी मीडिया पारनेर तालुका प्रतिनिधी रामचंद्र सुपेकर सर, पठारवाडी माजी सरपंच तथा उद्योजक संपतशेठ वाढवणे, सामाजिक कार्यकर्ते यासीन शेख यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने पत्रकार विरोधी कृती हल्ला समिती बाळशास्त्री जांभेकर यांचा २०२५ हा सन्मान संतपंढरी संपादकीय सल्लागार ॲड. सोमनाथ गोपाळे यांना देन्यात आला त्याबद्दल अभिनंदन करत सन्मान करत व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ॲड. सोमनाथराव गोपाळे यांनी पत्रकार संघ उत्कृष्ठ कार्याबद्दल संघ पदाधिकारी यांचा गुणगौरव करत आपण पुढील वाटचाल निर्भिडपणे करावी पत्रकार बांधवांच्या न्यायहक्क त्यासाठी कायदेशिर स्थरावर मदत करणार असल्याचे प्रतिपादन केले व शुभेच्छा दिल्या. पारनेर तालुक्यात पत्रकार संघ वाढीसाठी सलीमभाई हवालदार यांना संधी मिळणारं असे वरिष्ठांनी यावेळी मत व्यक्त केले.
सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर सर (महाराज) यांनी त्यांच्या जिवन काळात श्री मुलिका देवी उच्च माध्यमिक विद्यालय निघोज येथे प्रामाणिकपणे विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले . ता.पारनेर जि.अहिल्यानगर येथे ज्ञानदानचे वारकरी संत परंपरा वाढीसाठी कार्य अतिशय मनोभावे केले. सरांनी आदर्श, सुसंस्कारिक विद्यार्थी घडविण्यासाठी तसेच आदर्शगाव राळेगणसिद्धी या ठिकाणी दहा दिवसांचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. डोंगरावर ३०० वृक्ष लावून त्या डोंगराचे नामकरण बोरा टेकडी असे ठेवले. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल.
त्यांच्या उल्लेखनीय कार्य बद्दल त्यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा आयोजित २०२५ अध्यक्ष अन्सार शेख, उपाध्यक्ष जीवन मोहिते, दैनिक सरकार टाइम्स संपादक रूपाली सावंत,पोलीस निरीक्षक निलेश तांबे, बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद शिंदे,राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब कौठळे, पुणे जिल्हा अध्यक्ष शकीलभाई मणियार, महिला अध्यक्ष भाजपा अंजलीताई जाधव,दिपाली खोत अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, शिवाजी महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य,पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत गोळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आला.
यावेळी महाबळेश्वर तालुका अध्यक्ष राहुल शेलार, पत्रकार रियाज मुजावर, पत्रकार सलीमभाई हवालदार , संपादक/सल्लागार ॲड. सोमनाथराव गोपाळे, उद्योजक संपतराव वाढवणे, सामाजिक कार्यकर्ते यासीनभाई शेख तसेच विविध क्षेत्रातील व राज्यभरातील पत्रकार मान्यवर बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.