भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
महात्मा फुले युवक संघटनेचे वतीने महात्मा फुले जयंती निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सालाबादप्रमाणे या वर्षी ही खूप मोठा प्रतिसाद मिळाला असून 280 युवकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रणजित जाधव यांनी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून केले.
या प्रसंगी माजी सरपंच दीपक गवळी, चंद्रभागाचे संचालक सुनील पाटील, दिलीप भानवसे ,राजकुमार पाटील, विठ्ठल चौगुले,उपसरपंच नितीन शिंदे. मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे, माजी तलाठी धोंडीराम शिंदे,डॉ .विनोद एकतपुरे, डॉ. नंदकुमार जगताप. डॉ. राजेंद्र लाले ग्रामपंचायत सदस्य अर्जुनतात्या, जिगर गायकवाड, मुसा शेख,दत्तात्रय लिंगे , विशाल म्हेत्रे शिंदे.शुक्राचार्य गवळी,विजय शिंदे, अमोल लिंगे,सद्दाम सय्यद,गोरख तात्या लिंगे, बापू बुरांडे, अतुल भैया गवळी, जयरामतात्या शिंदे, शशिकांत विभुते,किशोर खरडकर,नीलेश गवळी व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सायकाळी 8.30 वाजेपर्यंत रक्तदान चालू होते. यावेळी सांगोला विधानसभा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे कौतुक करून आभार मानले. व रक्तदान विषयी माहिती देऊन महत्व सांगितले.
गेल्या वर्षभरात आपण गावातील व आसपासच्या गावातील 100 हून अधिक रुग्णांना सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले. अशी माहिती महात्मा फुले युवक संघटना अध्यक्ष किरण लिंगे यांनी दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून मेहनत घेत होते.संघटनेचे अध्यक्ष किरण लिंगे यांनी सर्व रक्तदात्यांचे स्वागत व आभार मानले.